Wednesday, June 24, 2009

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं



जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलं
फेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलं
मार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसली
एप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!


मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलो
जुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलो
जुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलं
ऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलं

सप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलो
ऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलो
नोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालं
एवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलं
म्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलं
धाडस करुन मी तिला प्रपोज केलं

त्यावर ती म्हणते कशी,
"
बारा महिने एकत्र भिरलो
हे काय कमी झालं
अरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड,
नविन वर्ष नाही का आलं?"

मन हे नेहमी
फुलपाखरासारखं असावं
एकिने नाही म्हटलं तर काय झालं
लगेच दुसरीवर बसायला हवं!!

Sunday, June 7, 2009

आठवेन मी तुला..


सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला

काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..

येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,
तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..

माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,
दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..

दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,
तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला...

माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,
तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला...

निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,
तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..

पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,
तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..

आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,
दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..

निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात
तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..

तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,
आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी तुला

मैत्रीण माझी

मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी

हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख
मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख

आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
मनातील वादळांना मनातच थोपवणारी

भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी

तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर

तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
हरलेi जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे

--------------------------------------------------------------------------------------------
मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु

वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु

तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु

अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु

इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु

आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु

अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु

सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु ...